निमगाव जि प गटात 9 जणांचे उमेदवारी अर्ज तर निमगाव पं स गणात 10 आणि गोरडवाडी पं स गणात 13 जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

भूमीपुत्र न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवार दि 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवसाखेर 44 निमगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव असणाऱ्या निमगाव जिल्हा परिषद गटात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्षांसह 9 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 87 निमगाव सर्वसाधारण जागेसाठी निमगाव पंचायत समिती गणात 10 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर 88 गोरडवाडी सर्वसाधारण महिला यासाठी राखीव असणाऱ्या गोरडवाडी पंचायत समिती 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
44 निमगाव जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या गटांमध्ये ऋतुजा धनाजी मस्के यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उज्वला सारंग ठवरे यांनी भारतीय जनता पार्टी कडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे सुवर्णा तुकाराम ठवरे यांनी शिवसेना या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निलावती मच्छिंद्र ठवरे यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शोभा सतीश कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शोभा कुलाळ यांनी 3 ठिकाणाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

87 निमगाव पंचायत समिती गण हा सर्वसाधारण असून या निमगाव पंचायत समिती गणातून दत्तात्रय पांडुरंग मगर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर किरण वसंतराव पाटील व गोरख संपत्ती मगर यांनी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दत्तात्रय रावसाहेब मगर यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सतीश शहाजी कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून गोरख विठोबा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पुरुषोत्तम पांडुरंग धायगुडे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विष्णुपंत नानासाहेब मगर यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे संतोष गोरख सदेवाले यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रणजीत महादेव ठवरे यांनी आपला भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशा एकूण दहा जणांनी निमगाव पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
44 निमगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या 88 गोरडवाडी पंचायत समिती गणात एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून या गटांतर्गत या गणांतर्गत भारतीय जनता पार्टी कडून सुवर्णा संजय देशमुख , चांगुनाबाई साहेबराव गोरड व लक्ष्मी यशवंत गोरड यांनी भारतीय जनता पार्टी कडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर मुक्ताबाई तानाजी साठे यांनी महाराष्ट्र विकास सेना या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर पुनम मच्छिंद्र गोरड यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे शोभा सतीश कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर जनाबाई शिवाजी गोरड यांनीही भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विजया अमोल कर्णवर पाटील व यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मोनिका विष्णू गोरड यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रेश्मा जगन्नाथ माने व मनीषा गौतम माने यांनी देखील शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शितल नारायण देवकाते यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे




