Uncategorized

अकलूजच्या शंकरराव मोहीते-पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु शितल घोगरे गोल्ड मेडल ने सन्मानित

भूमीपुत्र न्यूज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज मधील एम ए भाग 2 मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कु. शितल वसंत घोगरे हिने नुकत्याच विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात एम. ए . इंग्रजी विभागात विद्यापीठ स्तरावर (गुण 79.50 टक्के) प्रथम क्रमांक (Gold Medal) सुवर्णपदक पटकाविले असून तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील,शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील सचिव अभिजित रणवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील मार्गदर्शक शिक्षक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ एच के आवताडे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत सोहळा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाल मुगेराया, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महावर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परिक्षा मूल्यांकन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे,प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आयुष्यातही योगदान द्यावे, समाजकल्याणासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. यंदाच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात मुलींनी सुवर्णपदके पटकावली ही आनंदाची बाब आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक सुधारणा व धोरणे राबविली जाणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

कु शितल घोगरे हिने सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाचे ,पालकांचे तसेच अकलूज शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे कु शितल घोगरे ही मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष व अभियंता डॉ. विजय घोगरे यांची पुतणी आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!