माळशिरस तालुकाराजकिय

लोंढे मोहितेवाडीच्या उपसरपंच पदी सचिन जाधव बिनविरोध

भूमीपुत्र न्यूज

लोंढे मोहितेवाडी ता माळशिरसच्या उपसरपंचपदी श्रीनाथ विकास आघाडीचे सचिन सुखदेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली या अगोदर सरपंच पदी श्रीनाथ विकास आघाडीच्या अंजना विजयसिंह लोंढे या निवडून आल्या असून लोंढे मोहितेवाडीच्या एकूण 7 सदस्यांपैकी 6 जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या 1 जागेसाठी व सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती श्रीनाथ विकास आघाडीने विरोधी गटाचा धुव्वा उडवीत क्लीन स्वीप देत 7 पैकी 6 जागा बिनविरोध केल्या तर उर्वरित 1 जागाही बिनविरोध निवडून आली याचबरोबर सरपंच पदाच्या उमेदवार अंजना विजयसिंह लोंढे याही सरपंच पदासाठी निवडून आल्या .

नूतन उपसरपंच

सोमवार दि 9 जानेवारी 2023 रोजी लोंढे मोहितेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली परंतु उपसरपंच पदासाठी सचिन सुखदेव जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले होते वास्तविक पाहता श्रीनाथ विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्याने सचिन जाधव हे उपसरपंच होणार होते हे निश्चितच होते केवळ औपचारिक घोषणा करणे बाकी होते सचिन जाधव यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर श्रीनाथ विकास आघाडीने गावात एकच जल्लोष केला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरसचे जी एम वसावे हे उपस्थित होते यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य विशाल सोनमळे, ज्ञानेश्वर बोधले ,रूपाली ननवरे ,शीतल मोहिते ,उज्वला पोतेकर ,पुष्पा लोंढे या उपस्थित होत्या.

माझ्यावर लोंढे मोहितेवाडी ग्रामस्थांनी उपसरपंच पदाची जी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी निश्चितपणे विश्वासाने पूर्ण करीन व गावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी गावात आणून विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन
सचिन जाधव ,नूतन उपसरपंच लोंढे मोहितेवाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!