मराठा आरक्षणासाठी फळवणीत जोतीराम आवताडे यांचे आमरण उपोषण सुरू

भूमीपुत्र न्यूज
गरजवंत मराठा समाजाचे विद्यार्थी आरक्षण नसल्यामुळे शिक्षण,नोकरी यांमध्ये गुणवत्ता असूनही पात्र ठरत नसल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली अनेक वर्ष सातत्याने आंदोलने केली जात आहेत.मागील दीड ते दोन महिन्यापासून महाराष्ट्रात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकारला अपयश आल्याचे दिसून येत आहे .आरक्षणाच्या मुद्द्यावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी आमरण उपोषण ही सुरू करण्यात आले आहे.
फळवणी ता.माळशिरस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मागील सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे .रविवार दि.29 ऑक्टोबर 2023 दुपारी तीन वाजलेपासून येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते जोतीराम शिवाजी अवताडे यांनी आमरण उपोषण सुरू करून मनोज जरांगे पाटील यांना एकप्रकारे साथ दिली आहे.उपोषण स्थळी गावातील युवक ,जेष्ठ नागरिक बसून असून प्रशासनाच्या वतीने गांव कामगार तलाठी एम एम रणकुंभ, आरोग्यसेविका ठाकूर,वेळापूर पोलीस स्टेशन चे अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.




