माळशिरस तालुकासामाजिक

चांदापुरी येथील घटना … “दुल्हन हम ले जायेंगे”नवरदेव सांगलीचा…. नवरी चांदापुरीचीमुलगी पाहण्यासाठी आले अन… लग्न उरकून गेले

भूमीपुत्र न्यूज /रशीद शेख, चांदापुरी


आजकाल लग्न समारंभ पार पाडणे हे फार जिकीरीचे होऊन गेले आहे मुलगा, मुलगी पाहणे प्रत्यक्षात लग्न पार पडणे यामध्ये कितीतरी टप्पे असतात. यात येणारी विघ्ने ही वधु – वर दोघांचीही डोकेदुखी असते पण कधी – कधी अचानक ”झट मंगनी, पट शादी”चा सुखद अनुभव येतो असाच सुखद अनुभव चांदापुरी ता माळशिरस येथील अजिनाथ मसु कवळे यांच्या कुटुंबाला आला आहे.

कवळे यांची उच्चशिक्षित सुकन्या प्रतिभा बी.ए. हिला पाहण्यासाठी मंगळवार दि 26 सप्टेंबर 2023 रोजी जाकापुर जि सांगलीचे पाहुणे आले आणि चक्क लग्न करूनच नवरीला घेऊन गेले.

नवरदेव मुलगा उच्चशिक्षीत आणि कवळे घराणेही प्रागतिक विचाराचे मग उशीर कशाला असे म्हणत दुपारी मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील उपस्थित मान्यवरांनी लग्न आजच करायचे असा निर्णय घेतला वधु- वर पक्षानी यास त्वरीत मान्यता दिली अजिनाथ मसु कवळे रा चांदापुरी ता माळशिरस जि सोलापुर यांची कन्या वधू प्रतिभा बी ए व संजय रंगाराव साठे रा जाकापुर ता कवठे महांकाळ जि सांगली यांचे जेष्ठ चिरंजीव निलेश मेकॅनिकल इंजिनीयर यांचा शुभविवाह मंगळ दि 26 सप्टें2023 रोजी सायंकाळी ठिक 6.00 वा मोजक्याच उपस्थितांमध्ये पार पडला आणि दुल्हन हम ले जायेंगे मनात सायंकाळी वधुला घेवुन सांगलीला रवाना झाले

या विवाहाप्रसंगी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ , उपसरपंच तात्यासाहेब चोरमले , विजय पाटील , युवानेते शाहिद शेख , रमेश सुळ , हणमंत लोखंडे , हणमंत मिसाळ , मुनीर शेख , पठाणवस्तीचे ग्रा पं सदस्य अशोक सोनवणे ,माजी सरपंच महिबुब पठाण चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!