राजकुमार हिवरकर यांच्याकडे मोहोळ विधानसभा क्षेत्राची जबाबदारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

भूमीपुत्र न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाच्या मोहोळ विधानसभा क्षेत्राची निवडणूक जबाबदारी नातेपुते येथील शिवसेनेचे ओबीसी जिल्हाध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी नुकतेच त्यांना प्रदान केले आहे

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम,अण्णा कदम ,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
नातेपुते येथील रहिवासी असणारे राजकुमार हीवरकर पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच काम करीत असून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पक्षाने दखल घेऊन पक्षाने त्यांना मोहोळ विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार प्रसार करणे व त्यांना मार्गदर्शन आणि पक्ष संघटना वाढीसाठी त्यांची नियुक्ती केली असून हिवरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील रहिवासी असणारे राजाभाऊ हिवरकर हे माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सक्रिय राहणे गरजेचे होते परंतु माळशिरस तालुक्यातील इतर पक्षातील नेत्यांनी शिवसेनेचे एबी फॉर्म स्थानिकांना विश्वासात न घेता इतरांना दिल्यामुळे राजाभाऊ हिवरकर हे नाराज होते परंतु पक्षाने लागलीच पावले उचलीत राजाभाऊ हिवरकर यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्याने राजाभाऊ हिवरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.




