माळशिरस तालुकाराजकीयसामाजिकसोलापूर जिल्हा

सहकार क्षेत्रात महिलांचे वाढते पाऊल ; चांदापुरीच्या विकास सोसायटीची धुरा सुमन पाटील यांच्या हाती

भूमीपुत्र न्यूज

येथील चांदापुरी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन निवडीत श्रीमती सुमन सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेअरमनपदासाठी केवळ श्रीमती सुमन पाटील यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. यादव यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

प्रसंगी सोसायटीचे संचालक भीमराव डेरे, तनवीर पठाण, बापू लोखंडे, जयवंत सूळ, बलभीम काळे, विजय काळे, दोहातखान पठाण, अर्चना मदने उपस्थित होते.तसेच मावळते चेअरमन सर्जेराव कोपकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडीच्या वेळी भजनदास चोरमले, विजय पाटील, आप्पा पाटील, विलास धुलूगडे, तानाजी कोपकर, जयवंत पूकळे, शिवाजी पाटील, बाळू मदने, नितीन सरक, प्रमोद मगर, सागर लोखंडे, अशोक सोनवणे, राजू पाटील यांच्यासह सोसायटीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेत सोसायटीचे सचिव अजित हनुमंत लोखंडे, सहसचिव हनुमंत लोखंडे आणि शिपाई अजिनाथ कवळे यांनी सहकार्य केले.

नवनियुक्त चेअरमन श्रीमती सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि सभासदांचे प्रश्न प्रभावीपणे सुटतील”, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!