महाराष्ट्रमाळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

रविवार दि.9 नोव्हेंबर 2025 रोजी लवंग येथे होणार मराठा उद्योजक मार्गदर्शन मेळावा

भूमीपुत्र न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या रविवार दि.9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता 25/4 लवंग ता माळशिरस येथील सुगरण हॉटेल कार्यालय येथे मराठा उद्योजक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष जयकुमार केचे पाटील यांनी दिली.

या मराठा उद्योजक मार्गदर्शन मेळाव्यासाठी माळशिरस विधानसभा मतदार संघाचे राम सातपुते,सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे,लवंगचे माजी सरपंच निशांत कोकाटे पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे,श्रीराम शिक्षण संस्था पानीवचे अध्यक्ष प्रकाश
पाटील,प्रसिद्ध उद्योजक सुजयसिंह माने पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यासाठी नागेश पराडे पाटील, निनाद पाटील ,सौरभ मगर ,धनाजी साखळकर, संदीप भोरे,बँक ऑफ इंडिया अकलूज शाखेचे मॅनेजर मोहिते उपस्थित राहून तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा उद्योजकांनी या मार्गदर्शन मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष जयकुमार केचे पाटील यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!