निमगाव ग्रामपंचायतीचा लिपिक अफसर शेख यास अटक 3 दिवसाची मिळाली पोलीस कोठडी
भूमीपुत्र न्यूज
निमगाव (म) ग्रामपंचायतीच्या कर वसुली मध्ये बनावट पावती पुस्तकाचा वापर करून अनियमितता केले बद्दल निमगाव ग्रामपंचायतीचा लिपिक अफसर अल्लाउद्दीन शेख यास दि 9/3/2023 रोजी वेळापूर पोलिसांनी अटक केली असून दि 10/3/2023 रोजी माळशिरस येथील न्यायालयात हजर केले असता दि 13/3/23 पर्यंत 3 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास वेळापूर पोलिस स्टेशन चे पीएसआय राऊत हे करीत आहेत.
अफसर शेख यास निमगाव ग्रामपंचायत ने दिन 5/5/2021 रोजी निलंबित करून अनियमितता केलेली रक्कम वसूल करून घेतली होती त्यानंतर परत बनावट पुस्तक आढळून आल्यानंतर ग्रामपंचायतीने वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर चौकशी होऊन दिनांक 7/2/2023 रोजी वेळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावर वेळापूर पोलिस स्टेशन कडून चौकशी होत आहे या चौकशीत या कर्मचाऱ्याने अजून वेगळ्या पद्धतीने बनावट पावत्या देऊन ग्रामस्थांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे .
वेळापूर पोलिसांनी अटक केलेला व निमगाव ग्रामपंचायतीचा निलंबित कर्मचारी अफसर शेख याने काही दिवसापूर्वी कुटुंबासह निमगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी उपोषण केले यानंतर काही लोकांनी त्याच्या या उपोषणाला सहानुभूती दाखविली होती परंतु अफसर शेख याने बनावट पावत्या देऊन ग्रामस्थांची फसवणूक करूनही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेले उपोषण म्हणजे “उलटा चोर कोतवाल को डाटे” असे म्हणण्याची वेळ आली आहे .