कोल्हापूर येथे सर्किट बेंच होण्याकरिता प्रसाद जाधव मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये धावणार

भूमीपुत्र न्यूज /केदार लोहकरे
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच 6 जिल्ह्याकरीता कोल्हापूर येथे व्हावे या मागणीसाठी सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव हे रविवारी होणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत. याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समिती वतीने प्रसाद जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
6 जिल्ह्यातील जनतेसाठी सर्किट बेंच होणे आवश्यक आहे.सर्किट बेंच लढा अंतिम टप्यात असतानाही तो पूर्ण होत नाही यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.त सरकार व न्याय व्यवस्था यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसाद जाधव हे रविवारी 42 किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये धावणार आहेत,या अगोदरही त्यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे व सर्किट बेंच मागणी बाबत लक्ष वेधले आहे .
यावेळी बोलताना प्रसाद जाधव म्हणाले की,मी 6 जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक,पक्षकार यांचे वतीने माझी ही 42 किलोमीटरची लक्षवेधी धाव सर्किट बेंच मागणी करीता असणार आहे.या मॅरेथॉन मध्ये मी हायकोर्ट मुंबई परिसरात अतिरिक्त अनोख्या पद्धतीने धाव घेणार आहे असे सांगितले.
यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके,उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण,सचिव ॲड.विजयकुमार ताटे देशमुख उपस्थित होते माजी अध्यक्ष ॲड.प्रकाश मोरे, ॲड.सूर्यदीप भोसले,ॲड.राजेंद्र पाटील,ॲड.बाबा,ॲड.किरण महाजन,ॲड.महांतेश कोल्हे,ॲड.प्रमोद दाभाडे, ॲड.सचिन आवळे,ॲड.सचिन कलस,तसेच कोल्हापूर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरवड,विकास सावंत,निवास ब्रम्हपुरे,सुनील महाडिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




