निधन वार्तामाळशिरस तालुका

वाघोली गावचा युवक पै विजय माने शेंडगे काळाच्या पडद्याआड,वाघोली गावावर शोककळा

भूमीपुत्र न्यूज

वाघोली ता माळशिरस येथील युवक पै विजय विष्णू माने शेंडगे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे विजय माने शेंडगे हे विजय बापू या नावाने परिसरात सर्वदूर परिचित होते. तरुण वयात काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर वाघोली येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. विजय बापू माने शेंडगे यांच्या आकस्मित निधनाने वाघोली गावावर व मित्र परिवारावर शोककळा पसरली असून ते मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने यांचे पुतणे व वाघोली गावचे युवक नेते व माजी सरपंच योगेश माने यांचे बंधू होते. भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!