सुषमा अंधारे यांच्या हस्ते जयश्री इंगळे यांचा सत्कार
भूमीपुत्र न्यूज
शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते संगम ग्रामपंचायतच्या नूतन सदस्या जयश्री इंगळे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या की महिलांनी राजकारणात व समाजकारणात पुढे आले पाहिजे ही काळाची गरज आहे . जर सक्षमपणे महिला पुढे आल्या तर गाव खेड्यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही.आज जयश्री इंगळे ही सर्व सामान्य कुटुंबातील स्त्री संगम ग्रामपंचायत निवडून येते ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या व सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना घाडी, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे ,युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे ,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम अभंगराव, शिवसेना माळशिरस तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी, माळशिरस युवती सेना उपतालुका प्रमुख चांदणी पराडे, प्रशांत उर्फ नाना पराडे पाटील आदी पदाधिकारी , शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते .