महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त निमगाव येथे लेखक ,कवी प्रा.शिवाजी गायकवाड यांचे व्याख्यान

भूमीपुत्र न्यूज
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले तरुण मंडळ, निमगाव म. ता. माळशिरस जि सोलापूर जयंती उत्सव समारंभ समितीच्या वतीने मंगळवार दि 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा उस्मानाबाद , पुणे येथील ज्येष्ठ लेखक कवी प्राध्यापक शिवाजी गायकवाड सर व प्राध्यापक नानासो झगडे सर पुणे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा जयंत भंडारे, उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य तर कार्यक्रमासाठी महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष किशोर माळी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल अभंगराव ,समता परिषदेचे करमाळा तालुकाध्यक्ष दिलीप भुजबळ उपस्थित राहणार आहेत.

( लेखक, कवि, मराठी विभाग, प्रमुख)
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद
निमगाव येथे महात्मा फुले भाजी मार्केट ,स्टॅन्ड जवळ होणाऱ्या या कार्यक्रमासाठी युवक ,महिला, नागरिक व सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक बबन गायकवाड, मेजर बाळासो कुदळे, खजिनदार ज्ञानेश्वर शेंडे, सचिव शिवाजी शिंदे यांनी केले आहे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि 11 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वा प्रतिमा पूजन, होणार असून सायंकाळी 5.30 वा मिरवणूक तर सायंकाळी 7.30 वा व्याख्यान व रात्री 9 .00 वा स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समारंभ समितीच्या वतीने करण्यात आले आहे .




