माळशिरस तालुकासामाजिक

छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत तरंगफळ येथे विद्यार्थ्यांना दाखले वाटप शिबिर संपन्न

भूमीपुत्र न्यूज

छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत तरंगफळ ता माळशिरस येथे शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप करणेत आले.हे शिबीर अकलूजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर व माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ यांचे मार्गदर्शनाखाली तरंगफळ येथे मंगळवार दि 24 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना उत्पन्न ,वय, अधिवास व राष्ट्रीयत्व , जातीचे दाखले , नॉन क्रिमिलियर व इतर सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी शिबिर घेण्यात आले .

या कार्यक्रमासाठी शरद खंडागळे मंडल अधिकारी माळशिरस , पद्मिनी तरंगे सरपंच तरंगफळ , गोरख जानकर अध्यक्ष दिव्यांग संघटना ,महादेव तरंगे माजी सरपंच ,सुजित तरंगे सामाजिक कार्यकर्ते नारायण तरंगे ,रावसाहेब तरंगे, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी नागटिळक, निलेश कुंभार ,रोहन करकरे ग्रामपंचायत अधिकारी, संतोष पानसरे मुख्याध्यापक छाया गोटे, शिक्षक, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!