माळशिरस तालुकाशैक्षणिक

पारंपारीक शिक्षण पध्दतीतून बाहेर पडा – धैर्यशील मोहिते पाटील

शिवरत्न शिक्षण संस्थेचा “लक्ष्य” उत्साहात संपन्न ,2022 जनरल चॅम्पीअनशीप शिवरत्न सीबीएसई स्कूलकडे

भूमीपुत्र न्यूज

जगामध्ये बदलाची सुनामी येऊ लागली आहे.जग झपाट्याने डिजीटल होऊ लागले आहे. म्हणून शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड करावे.पारंपारीक शिक्षण पध्दतीतून बाहेर पडुन जगामध्ये होणाऱ्या बदलांचे शिक्षण शिक्षकांनी स्वतः घेऊन ते विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असल्याचे मत शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

शिवरत्न शिक्षण संस्थे अंतर्गत असणाऱ्या सर्वच शाळा व महाविद्यालयांच्या वार्षिक प्रगतीचा लेखा जोखा मांडण्यासाठी लक्ष्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांमधून निवृत्ती झालेल्या,उत्तम काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.शिवरत्न सीबीएससी स्कुलला जनरल चॅम्पीअनशीप,विजयसिंह मोहीते पाटील नर्सिंग कॉलेजला बेस्ट इन्स्टीट्यूट तर रायजींग इन्स्टीट्युट म्हणून शिवरत्न मॅनेजमेंट स्टडीजचा सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले,संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी यांनी संस्थेला आर्थिक शिस्त दिली.त्यामुळे संस्था प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग कॉलेजची भव्य इमारत झालेली आपणास पाहायला मिळेल.त्याचबरोबर नवी संकल्पना घेऊन आयटीआय सुरू करण्याचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण होताच त्यांच्या हाताला काम मिळेल.आज अखेर या संस्थेत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली आहे. त्यामुळे आम्ही स्वतःचे विद्यापीठ सुरू करण्याचे स्वप्न पाहत आहोत.

शितलदेवी म्हणाल्या,१५० विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या संस्थेमध्ये आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ज्या पालकांना एकच मुलगी आहे अशांना उर्मिलादेवी शिष्यवृत्ती देण्यात येते.त्यांच्या पाल्यांना नर्सरी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते.येथील विद्यार्थी आज खाजगी व सरकारी क्षेत्रांमध्ये विविध पदांवर काम करताना दिसत आहेत.

यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, शिवदास शिंदे,डॉ.विश्वनाथ आवाड,श्रीकांत राऊत,दत्तात्रय लिके,अनिल जाधव,नितीन बनकर,प्रशांत जगताप,संजय जावळे,तानाजी काशिद,हेमंत टेके,प्राचार्य अरविंद कुंभार,प्रा.अल्बर्ट थारकन,प्रा.बीनो के.पॉल्स,डॉ. हरी ढेंबरे,प्रा.जितेंद्र माने देशमुख, प्रा.शिवतिर्थ हिरेमठ,अश्रफ शेख, समाधान वाघमारे,संस्थेचे सर्व संचालक,प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीत देशमुख,झुलेखा मुखेबी,नुरजाॅहा शेख,अनिल लोंढे,भारत साठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!