माळशिरस तालुका

अकलूज येथे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उदघाटन , पहिल्याच दिवशी सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथे बाबुशेठ चव्हाण पाटील आणि परिवाराच्यावतीने नव्यानेच सुरुवात करण्यात आलेल्या धनलक्ष्मी ज्वेलर्स या भव्य दालनाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच के एम पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे ,डॉ एम के इनामदार ,श्रीराज माने पाटील ,संकल्प डोळस ,दीपक खराडे पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदघाटनानंतर बोलताना चेअरमन जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की पूर्वीचे अकलूज व सध्याचे अकलूज यामध्ये अमुलाग्र बदल झाला असून दूरदृष्टी ठेवूनच मागील काळात स म शंकरराव मोहिते पाटील आणि विजयदादा यांनी अकलूजच्या विकासात आपले मोलाचे योगदान दिले आहे अकलूज मध्ये नवनवीन व्यवसायाची सुरुवात होते हे अकलूजच्या दृष्टीने जमेची बाजू असून भविष्यात अकलूजची बाजारपेठ ही एक नामांकित बाजारपेठ असेल असेही गौरव उद्गार जयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी काढले

अकलूज येथील महर्षी चौकात स्वयं उदय कॉम्प्लेक्स मध्ये धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या माध्यमातून बाबुशेठ चव्हाण पाटील यांनी अकलूज आणि परिसरातील नागरिकांना अस्सल सुवर्णपेढी उपलब्ध करून दिली असून गेल्या 30 वर्षापासून ते या व्यवसायात असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली अकलूज आणि परिसरातील धनलक्ष्मी ज्वेलर्स ही एकमेव सुवर्णपेढी आहे या माध्यमातून उद्घाटनाच्या दिवशीच या भव्य दालनात सोने खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशा झुंबड उडालेली दिसून आली शुभारंभाच्या दिवशी अनेक आकर्षक बक्षीस योजना ही या निमित्ताने जाहीर केल्या आहेत याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बाबुशेठ चव्हाण पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी डॉ. तानाजी कदम , अण्णासाहेब शिंदे, सुदर्शन मिसाळ, अमर जगदाळे ,नितीन निंबाळकर ,ॲड नितीन खराडे पाटील, दिलीप चव्हाण, नवनाथ सावंत ,भारत चव्हाण, रोशन चव्हाण व रेखा चव्हाण याचबरोबर माळशिरस व आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर एम के इनामदार आप्पासाहेब जगदाळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक निनाद पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार संतोष साठे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!