माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते विधान परिषदेवर ?
भूमीपुत्र न्यूज
13 एप्रिल 2026 रोजी विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या एकूण जागांपैकी 4 जागा या भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येणार असून या 4 जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या चार जागांवर केशव उपाध्ये, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, याचबरोबर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
याचबरोबर राज्यसभेमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही अशांनी देखील विधान परिषदेसाठी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केले आहे.विधान परिषदेच्या आमदारकीसाठी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहिले जाते परंतु पक्ष जो आदेश देईल तो आदेश शिरसावंद मानून काम करणारे माजी आमदार राम सातपुते यांच्या विधान परिषदेच्या नावाच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे यात नेमके सत्य काय याबाबत माहिती घेतली असता माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात प्रस्थापित ,बलाढ्य सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकाकी लढत देत केलेला संघर्ष, मिळविलेले यश आणि कामाच्या माध्यमातून तालुक्यात भाजपाचा तयार केलेला मतदार हा त्यांच्या कामी येऊ शकतो असेही बोलले जात आहे.
माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या बलाढ्य ताकतीसमोर माजी आमदार राम सातपुते यांनी कडवे आवाहन दिल्याचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी हेच आपले मायबाप समजून माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपाची पाळेमुळे माळशिरस तालुक्यात रोवल्याची दिसत आहेत याच अनुषंगाने वरिष्ठांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे माजी आमदार राम सातपुते हे विधान परिषदेवर जाणार का ? हे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच समजेल.




