निधन वार्तामाळशिरस तालुका

डाॅ चंद्रकांत निंबाळकर यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज

डॉ. चंद्रकांत शंकरराव निंबाळकर रा. जांभूड ता माळशिरस यांचे मुंबई येथे गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.00 वा. उपचारादरम्यान ब्रिजकँडी हॉस्पिटल येथे निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 54 वर्षे इतके होते ते पंढरपूर येथे शासकीय सेवेत पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते याचबरोबर, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक राज्य संघटनेचे अध्यक्ष होते

महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय राज्य संघटनेचा एक धाडसी नेतृत्व हरपले असून ते कार्यशील व कृतिशील अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित होते त्यांच्या पश्चात एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी जांभूड ( माळेवाडी) ता माळशिरस येथे शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

निडर,धैर्यवान, सामर्थशाली स्व. डॉ चंद्रकांत शंकरराव निंबाळकर यांना भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!