माळशिरस तालुका

काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सतीश पालकर यांची फेरनिवड

मा.मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र

भूमिपुत्र न्यूज

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी अकलूज, गिरझणी येथील सतीश संभाजी पालकर यांची नुकतीच फेरनिवड करण्यात आली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोलापूर येथे सतीश पालकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, माजी आ सिद्धाराम म्हेत्रे ,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार ,रमेश हसापुरे, सुधीर लांडे, भीमराव बाळगी ,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ साठे ,रत्नप्रभादेवी मोहिते पाटील पतसंस्थेचे संचालक विकास शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तालुकाध्यक्ष पदांच्या निवडी नव्याने झाले असून काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची निवडही नव्याने झाली आहे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सभासद डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सतीश पालकर यांनी केले असून काँग्रेसचे विचार तळागाळात रुजविण्याचे काम पालकर यांनी केले आहे त्याच कामाची पोहोच पावती म्हणून सतीश पालकर यांना 1 जून त्यांच्या वाढदिनी पुन्हा एकद माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारीची भेट काँग्रेसने पालकर यांना दिली आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी पक्ष संघटना निवडणुकीच्या माध्यमातून प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी माळशिरस तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सतीश पालकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले असून हे पत्र माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले असून या पत्रात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ,सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ,जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आपण आपले कार्य आपल्या कर्तुत्वाने दैदिप्यमान कराल अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!