माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ अकलूज मध्ये धडाडणार …!

सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने विराट सभेचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज

मराठा आरक्षणासाठी विशाल जनसमुदाय उपस्थित असणाऱ्या जगातल्या क्रमांक एकच्या सभेला 14 ऑक्टोबर 2023 रोजी मार्गदर्शन करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर विराट सभा अकलूज येथे शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा आयोजित केली असल्याची माहिती सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली.

या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज समन्वय समिती माळशिरस तालुका परिश्रम घेत असून या संदर्भात अकलूज शासकीय विश्रामगृह येथे मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वा माळशिरस तालुका मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित केली असल्याची माहिती समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.

या बैठकीमध्ये माळशिरस तालुका मराठा समन्वय समितीचे सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे व ही बैठक वेळेवर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली नियोजनाच्या बैठकीमध्ये माळशिरस तालुका मराठा समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहतील.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर देखील समाज बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना पश्चिम महाराष्ट्रातून या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची सर्वांना उत्सुकता लागली असून माळशिरस तालुका सकल मराठा समाज समन्वय समिती यासाठी विशेष परिश्रम घेत आहे याबाबत सविस्तर माहिती लवकरच समाज बांधवांना कळविण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!