महाराष्ट्रमाळशिरस तालुका

निमगावच्या उपसरपंचपदी नंदकुमार मगर- पाटील यांची बिनविरोध निवड

भूमीपुत्र न्यूज

निमगाव (म) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नंदकुमार प्रभाकर मगर- पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सलग दोनदा उपसरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला आहे निमगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निमगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये नंदकुमार मगर पाटील यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली निवडणूक निरीक्षक म्हणून किरण मोरे ,सहाय्यक गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती यांनी काम पाहिले.

निमगावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 50 वर्षानंतर सत्तांतर झाले असून सहकार महर्षी पॅनलला 6 जागा तर निमगाव ग्रामविकास आघाडीला 11 जागा अधिक सरपंच पदाचा उमेदवार निवडून आले होते यानुसार निमगावच्या उपसरपंच पदी कोणाची वर्णी लागणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते सहकार महर्षी पॅनल कडून उपसरपंच पदाचा अर्ज भरला जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती परंतु सहकार महर्षी पॅनलने उपसरपंच पदाचा अर्ज दाखल न केल्याने नंदकुमार मगर पाटील हे निमगावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या या निवडीनंतर निमगावात जल्लोष करण्यात आला यावेळी विविध स्तरातून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!