डॉ.श्रद्धा जवंजाळ यांची राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी निवड

भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील डॉ श्रद्धा राहुल जवंजाळ यांची राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी डॉ बीरेन दवे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नुकतीच नियुक्ती केली.डॉ श्रद्धा जवंजाळ 10 ते 12 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य आदी विषयात याच बरोबर महिला व बालकल्याण उद्धारासाठी काम करीत असून त्यांची सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय महासचिव पदी निवड केली आहे.
राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषदेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून आंतरराष्ट्रीय कार्यालय लंडनमध्ये तर प्रशासकीय कार्यालय केरळ राज्यात आहे .या परिषदेने महिला व बालकल्याण यांचा विकास होण्यासाठी अध्यक्ष डॉ बिरेन दवे हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर 13 संस्थांवर काम पहात असून त्यांना आंतरराष्ट्रीय पॅडमॅन म्हणून ओळखले जाते. तसेच या परिषदेचे चेअरमन ॲड डॉ के विजया राघवन आहेत .डॉ श्रद्धा जवंजाळ या एलिमिनेशन ऑफ सर्वाइकल कॅन्सर फ्रॉम इंडिया या विषयावर सध्या 9 ते 20 या वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लसीकरण राज्यात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन याबाबत जागरूकता करीत आहेत गर्भाशयाच्या कॅन्सर हा महिलांमधील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आजार असून राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे या संधीचे ते निश्चित सोने करून दाखवतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.




