महाराष्ट्रराजकीयसोलापूर जिल्हा

अजय बारस्करांची पंढरपुरात गाडी जळून खाक

भूमीपुत्र न्यूज

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे अजय महाराज बारस्कर यांची टोयाटो गाडी जळून खाक झाली आहे. ही घटना बुधवारी (ता.17) मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐन वारी काळात गाडीला आग लागली की लावली या बाबतचा संभ्रम मात्र अजून ही कायम असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय बारस्कर हे आषाढी वारीसाठी आपल्या (एम एच 12-BP-2001) चारचाकी गाडीतून पंढरपुरात आले होते. 16 जुलै रोजी दुपारी 65 एकर परिसरातील नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली टोयाटो कंपनीची चार चाकी गाडी पार्किंग केली होती. बुधवारी (ता.17) दुपारी अजय बारस्कर आपली गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले असता त्यांना गाडी जळून खाक झाल्याचे दिसून आले. यामध्ये दहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.‌या प्रकरणी अजय बारस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री.मुजावर करत आहेत.

जळालेली गाडी डाॅ जयदीप दाते यांच्या नावावर

पंढरपुरात जळालेल्या टोयाटो गाडीची कागदपत्रे डाॅ. जयदीप दाते यांच्या नावावर आहेत. ही गाडी अजय बारसकर यांनी 2022 मध्ये गाडी खरेदी विक्री करणारे शिरूर येथील मनोज मानाभाऊ इंगळे यांच्याकडून वापरण्यासाठी विकत घेतली आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!