कर्मयोगी शिवाजीराव पाटील निलंगेकर स सा कारखाना लि,ओंकार साखर कारखाना प्रा लि युनिट नंबर 2 चा इथेनॉल, सीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ 23 एप्रिल 2023 रोजी
केंद्रीय राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे पाटील यांची प्रमुख उपस्थिती
भूमीपुत्र न्यूज
लातूर जिल्ह्यातील ,निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) जाजनूर (झरी) येथील कर्मयोगी शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक 2 या साखर कारखान्याच्या 150 के एल पी डी इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्प,15 टीपीडी सीएनजी प्रकल्प उभारणी व 200 मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारणी भूमिपूजन समारंभ सोहळा रविवार दि 23 एप्रिल 2023 रोजी रोजी सकाळी 9.30 वा केंद्रीय रेल्वे कोळसा व खाण राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील ,संचालिका रेखाताई बोत्रे -पाटील उपस्थित राहणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हित डोळ्यापुढे ठेवून चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळावा, या परिसरातील विकासास हातभार लागावा या हेतूने या साखर कारखान्याशी संलग्नित 150 के एल पी डी इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्प उभारणी,15 टीपीडी सीएनजी प्रकल्प उभारणी व 200 मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारणी भूमिपूजन समारंभ सोहळा रविवार 23 एप्रिल रोजी आयोजित केला आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांसह सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे .