ॲड जी पी कदम यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सन्मान

भूमीपुत्र न्यूज
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोमवार दिनांक 4 मे रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी माळशिरस तालुक्यातून जात असताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय माने साखळकर यांच्या चौंडेश्वरवाडी अकलूज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी माळशिरस येथील न्यायालयात गेल्या वीस वर्षापासून आपली वकिलीची सेवा देत असलेले हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित असलेले ॲड जी पी कदम यांचा विशेष सन्मान मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजातील सर्वच घटकांची बाजू भक्कमपणे मांडून आपल्या असामान्य कर्तुत्वाने अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न ॲड जी पी कदम हे दिल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षण चळवळ यामध्ये आपल्या ज्ञानाने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ॲड जी पी कदम हे करीत आहेत या कार्याचा गुणगौरव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शाल व पुष्पहार देऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे ,मराठा सेवा संघाचे निनाद पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष जयकुमार केचे पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा मीनाक्षी जगदाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष शारदा चव्हाण, सचिन गायकवाड अमोल जगदाळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




