माळशिरस तालुका
तांदुळवाडीचे सुपुत्र धनाजी सुर्वे यांची मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी पदी निवड

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील धनाजी शहाजी सुर्वे यांची मुंबई महापालिकेच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड झाली असून त्यांचे प्राथमिक शिक्षण तांदुळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात एम.ए.मराठी ही पदवी घेतली यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम.ए.मास कम्युनिकेशन्सचे शिक्षण पूर्ण केले.तेथे त्यांना विभागप्रमुख निशा मुंडे-पवार,प्राध्यापक शिवाजी जाधव,सुमेधा साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या जनसंपर्क अधिकारी निवडीमुळे तांदुळवाडी सह माळशिरस तालुक्यातून धनाजी सुर्वे यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




