माळशिरस तालुका

तांदुळवाडी मधील 35 वर्षापासून बंद असलेला रस्ता वेळापूरचे एपीआय निलेश बागाव यांनी केला सुरू

भूमीपुत्र न्यूज

वेळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाडी येथील सातारा -पंढरपूर या महामार्गालगत असणारा महत्त्वपूर्ण तांदुळवाडी -खोरेवस्ती हा रस्ता गेल्या 35 वर्षापासून बंद होता तांदुळवाडी गावातील प्रत्येक निवडणुकीत या रस्त्यावरून आरोप प्रत्यारोप होत होते परंतु गेल्या 35 वर्षापासून निवडणुकीपुरताच निघणारा या रस्त्याचा विषय निवडणुकीनंतर हवेतच विरून जात होता यावर अवलंबून असणाऱ्यांना केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत होते.

यास कंटाळून शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा नकाशातील आहे तो खुला करावा यासाठी तहसीलदार माळशिरस यांच्या कडे मागणी केल्याने त्याचा निकालही शेतकऱ्यांच्या बाजूने लागला निकालानंतर तीन चार महिने सामजंसपणे रस्ता खुला करण्यासाठी भरपूर प्रयन्त झाले तरीही मार्ग निघेना व यांत कोणीही लक्ष घालेना म्हणून संबधित प्लाॅटधारकाना शेतकऱ्यांनी विनवन्या करून रस्ता मागितला तरीही मार्ग निघेना शेवटचा पर्याय म्हणून यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळापूर पोलीस स्टेशन गाठले व वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्यासमोर आपली कैफियत मांडली यानंतर एपीआय निलेश बागाव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे यांनी प्लॉट धारक व अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समेट घडविला आणि तिथूनच हा रस्ता खुला झाला.

यासाठी धनाजी चव्हाण,दत्ता कदम,सज्जन कदम,कल्याण गायकवाड,बापू बाबर,तात्यासो सुरवसे ,प्रशांत निंबाळकर ,मिलिंद शिंदे , हणमंत धनवडे,महादेव धनवडे,बाळासाहेब भोसले,बाळासाहेब राजगुडे ,किसन शिंदे,भास्कर केदार,प्रल्हाद भोसले,दशरथ मिले,जोतिराम शिंदे,अमोल राऊत आदी उपस्थित होते.

वेळापूरचे एपीआय निलेश बागाव व पोलीस कर्मचारी संजय रेगुडे ,राजगे यांच्यासारखे अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टेशनला असतील तर गावागावातील तंटे गावातच मिटून कोर्टात जाणार नाहीत वेळापूर पोलिसांच्या सहकार्याने गेल्या 35 वर्षापासून बंद असलेला रस्ता तर सुरू झालाच परंतु दोन्ही बाजूंचा समेट घडवून 22 फूट रुंदीचा रस्ता सुरू करून दिल्याने वेळापूर पोलिसांचे तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!