दहिगावच्या शिवप्रसाद उद्योग समूहाचा स्तुत्य उपक्रम…माळशिरस तालुक्यातील 56 गावातील 750 लोकांची रायगड वारी

भूमीपुत्र न्यूज
बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी होणाऱ्या 351 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दहिगाव ता माळशिरस येथील शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील 56 गावातील 750 लोकांना अत्याधुनिक प्रवासी बसच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिन रायगडावरती पाहता यावा यासाठी गुरुवार दि 5 जून रोजी नातेपुते ता माळशिरस इथून रायगड कडे विधीवत पूजा करून या प्रवासी बसेस रवाना करण्यात आल्या.

नातेपुते येथून रायगडवारीचा प्रारंभ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर ,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजने, आयोजक व शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरद मोरे ,दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुजा मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचा सत्कार शरद मोरे यांच्या हस्ते तर एपीआय महारुद्र परजणे यांचा सत्कार शिवप्रसाद उद्योग समूहाचे संचालक वैभव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रमेश मोरे,अश्विनी मोरे ,तेजस मोरे, दिलीप सोरटे, अण्णा चिकणे, तुषार निकम,सुशांत पाटील, माऊली देशमुख, गणेश सोनवले, सुहास देशमुख, अभिजित भिसे.आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते मनोमन इच्छा असूनही ज्यांना रायगडावर जाता येत नव्हते अशा तालुक्यातील 56 गावातील 750 लोकांना अत्याधुनिक 15 प्रवासी बसच्या माध्यमातून रायगडावरती नेऊन त्या ठिकाणी त्यांना दैदीप्यमान असा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पाहायला मिळणार आहे जाणाऱ्या लोकांची जेवण, नाश्ता, पावसासाठी रेनकोट ,टी-शर्ट आशा सर्व वस्तू शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत .
शरद मोरे, संस्थापक अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव.




