राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबीरातून युवकांचे उज्वल भविष्य घडते/जयसिंह मोहिते पाटील

भूमीपुत्र न्यूज / केदार लोहकरे
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबीरातून युवकांचा व्यक्तीमत्वाचा विकास होत आहे सर्वांना हक्काची जाणीव आहे पण कर्तव्याची जाणीव दिसून येत नाही.मात्र आज सर्व शिबीरार्थींचा आत्मविश्वास वाढलेला व कर्तव्याची जाणीवही झालेली दिसून येत आहे.या शिबिरातून युवकांचे उज्वल भविष्य घडते अशा शिबीरांची देशाला गरज आहे.असे मौजे चाकोरे येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी स म शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील म्हणाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.
यावेळी विचारपीठावर चक्रेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सभापती किसन भिताडे, शिवामृतचे संचालक हनुमंत शिंदे,युवानेते राहुल वाघमोडे,सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना शंकरनगरचे संचालक लक्ष्मण शिंदे,सरपंच नवनाथ जाधव,उपसरपंच सचिन कचरे,चंद्रकांत शिंदे,सागर वरकड,डॉ.चंकेश्वर लोंढे,डॉ.बाळासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास”विशेष श्रमसंस्कार सात दिवसांचे शिबीर मौजे चाकोरे येथे संपन्न झाले.या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावात ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण व वृक्षदिंडी,श्रमदानातून वनराई बंधारा बांधणे,चक्रेश्र्वर मंदिर,विठोबा पाटील,जि.प.शाळा,निरा नदी घाट परिसरात स्वच्छता व श्रमदान केले.तसेच गावातील भिंतीवरती व्यसनमुक्तीवर सुविचार लिहून प्रभातफेरी काढून जनजागृती केली.या दरम्यान महिला मेळावा,संमोहनशास्त्र, जादूचे प्रयोग,भारुड,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.या कालावधीत डॉ.विश्वनाथ आव्हाड,डॉ.लक्ष्मण आसबे,प्रा.धनंजय देशमुख,जितेंद्र बाजारे, सुमित भोसले यांची वैचारिक व्याख्याने संपन्न झाली.
यावेळी हितेश पुंज,स्नेहा मगर,किरण भांगे यांनी आपल्या मनोगतातून शिबीरातील आपले अनुभव व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले,तर सूत्रसंचालन डॉ.विजयकुमार शिंदे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.बलभीम काकुळे यांनी मानले.हे श्रमसंस्कार शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ दत्तात्रय मगर, डॉ.सज्जन पवार,डॉ.सविता सातपुते यांनी परिश्रम घेतले.
माळशिरस तालुक्यात चार कोर्ट आहेत ,तिथे न्यायदानाचे काम चालतेच,पण आपल्या तालुक्यासाठी ‘बाळदादा’हे आणखी एक जलद व योग्य न्याय देणारे पाचवे न्यायालय आहे,त्याचा समाजाला खूप उपयोग होतो”
ॲड चंद्रकांत शिंदे




