महाराष्ट्र

कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणेकरिता सरकार दरबारी प्रयत्न करणार/ आ. सदाभाऊ खोत

भूमीपुत्र न्यूज/ केदार लोहकरे


सर्व सामान्य जनता,शेतकरी यांना जलद व स्वस्त न्याय मिळणे करीता लवकरच सरकार दरबारी प्रयत्न करणार.राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सदाभाऊ खोत यांचा अध्यक्ष गिरीश खडके यांचे हस्ते शाल,पुस्तक,मोमेंटो देऊन सत्कार करणेत आला.यावेळी अध्यक्ष ॲड गिरीश खडके,बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड विवेक घाटगे यांनी सर्किट बेंच स्थापने बाबत पाठपुरावा करावा या आशयाचे निवेदन दिले. ॲड गिरीश खडके यांनी सर्किट बेंच मागणी अंतिम टप्यात आलेचे त्यांचे निदर्शनास आणून दिले. आपण सर्व सामान्य शेतकरी वर्गाचे नेतृत्व केले आहे आपल्याला या प्रश्नांची जाण आहे,सर्किट बेंच स्थापन होणे करीता राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे, तरी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की,मी स्पष्टपणे सरकार दरबारी या सर्किट बेंच मागणीची विचारणा करणार करणारा असून.लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासन दिले या वेळी शेतकरी संघटनाचे नेते जालिंदर पाटील कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड.सुशांत चेंडके, ॲड.अमर गोनुगडे, ॲड.वाय पी उगवे, ॲड.श्रेणिक पाटील, ॲड.धैर्यशील पोवार, ॲड.विजय मालेकर आदी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!