पानीवला ‘जल जीवन मिशन’अंतर्गत
स्वयंचलित , सौरऊर्जेवर चालणारी जिल्ह्यातील पहिली योजना मंजूर

भूमीपुत्र न्यूज
पानीव ता. माळशिरस येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तत्कालीन सरपंच श्रीलेखा पाटील व डॉ. सुनील पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून जल जीवन मिशन अंतर्गत स्वयंचलित सौरऊर्जेवर चालणारी 9 कोटी 54 लाख रुपयांची जिल्ह्यातील पहिली योजना मंजूर झाली असून या योजनेतून पानीव गावात तसेच वाड्यावस्त्यांवरील प्रत्येक घरात, प्रत्येक नागरिकाला फिल्टर केलेले पाणी(क्षार विरहित) दर दिवशी दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी नळाद्वारे मिळणार आहे यामुळे ग्रामस्थांमधून या योजनेचे कौतुक केले जात आहे.
पानीव ग्रामपंचायतीने ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून 29 डिसेंबर 2022 रोजी शासनाने आदेश निर्गमित केला आहे यानुसार 9 कोटी 54 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. संपुर्णपणे स्वयंचलित व सौर उर्जेवर चालणाऱ्या या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
पानीव गावठाण,घुलेनगर, चव्हाण वस्ती, डोंबाळेवस्ती ,घुलेवस्ती, गोफणेवस्ती, खताळवस्ती, कोळी वस्ती, कुलाळवस्ती, निकम गुरववस्ती, पवार, इंगळे, शिंदेवस्ती, रामोशी वस्ती, सरवदेवस्ती, वैदुवस्ती या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून त्यासाठी संबंधित ग्रामस्थ स्वखुशीने जागा उपलब्ध करून देणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले या अंतर्गत गावातील .
ही योजना मंजूर करणेकामी आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांनी पाठपुरावा केल्याचे यावेळी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

