माळशिरस तालुकासामाजिक

पत्रकारांच्या लेखणी मध्ये प्रभावी ताकद-भाऊसाहेब गोसावी

भूमीपुत्र न्यूज

पत्रकार हा समाजाचा आरसा असून सर्वसामान्यांच्या हिताच्या गोष्टी समाजापुढे प्रभावीपणे मांडण्याची ताकद ही पत्रकारितेमध्ये असते त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करीत असतात असे मत वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी व्यक्त केले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिन वेळापूर पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला,याप्रसंगी ते बोलत होते.


याप्रसंगी विचार पिठावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे,आकाश शेळके,नितीन लिगडे,आदी उपस्थित होते .माळशिरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष निनाद पाटील ,श्रीनिवास कदम पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वेळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना सन्मानपत्र,डायरी व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या या कार्यक्रमासाठी वेळापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सर्व गावातील पत्रकार बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक रामभाऊ मगर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!