माळशिरस तालुकासामाजिक

युवकांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा /ॲड एम एम मगर

भूमीपुत्र न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचुन उपयोग नाही तर युवकांनी महाराजांच्या पराक्रमाची जाणीव ठेवुन आपल्या वर्तुणकीतून व कार्यातून त्यांचा आदर्शवत इतिहास जिवंत ठेवला पाहिजे.शिवाजी महाराज हे युवकांचे आदर्श होते यामुळे आजच्या काळात युवकांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा असे मत आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांनी मांडले.

कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त माळशिरस येथे बोलत होते यावेळी पुढे बोलताना ॲड मगर म्हणाले की, केवळ महाराजाचा पराक्रम,शुरत्व, बुध्दी,हुशार,कावेबाज,आणि लढाया – तलवार यांच्या ही पलीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले पाहिजे महाराजाचे कार्य केवळ ढाल – तलवार आणि लढाया किल्ले एवढ्यापुरते मर्यादित नाही तर शिवाजी महाराजांची आदर्श राजनीती शेती व पाणी व्यवस्थापन,न्याय यातुन एक आदर्श शासन व्यवस्था निर्माण केली. त्यांच्या योजना ह्या लोक कल्याणकारी होत्या.अवघ्या 25 ते 30 वर्षात शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व्यवस्था निर्माण केली.पण आपल्याला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली तरी पण आपण शिवाजी महाराजांची आदर्श व्यवस्था निर्माण करु शकलो नाही,यांची खंत वाटते म्हणून युवकांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेवुन एक आदर्शवत स्वतः चे व्यक्तीमत्व, कुटुंबं व्यवस्था निर्माण करुन समृध्द समाज, राष्ट्र निर्माण करण्याचे काम करावे तरच शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन केल्यांचे व आदर्श राष्ट्र निर्माण केल्याचे सार्थक होईल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माळशिरस मधील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!