महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भूमीपुत्र न्यूज

राज्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य किंवा थेट सरपंच यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या ठिकाणी राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे जागा रिक्त झाल्या आहेत, त्या जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, निवडणुकीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:​निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे:​निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे: ३० मार्च २०२६ (सोमवार)​नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करणे: ७ एप्रिल २०२६ ते १३ एप्रिल २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत).​उमेदवारी अर्जांची छाननी: १५ एप्रिल २०२६ (बुधवार).​उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: १७ एप्रिल २०२६ (शुक्रवार, दुपारी ३ वाजेपर्यंत).​निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी: १७ एप्रिल २०२६ (शुक्रवार, दुपारी ३ नंतर).​मतदानाचा दिनांक: २८ एप्रिल २०२६ (मंगळवार). सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत. (नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत).​मतमोजणी आणि निकाल: २९ एप्रिल २०२६ (बुधवार).​निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे: ६ मे २०२६ पर्यंत.

Oplus_16908288

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!