चांदापुरी ग्रामपंचायत तब्बल… पंधरा वर्षानंतर सत्तांतर

भूमीपुत्र न्यूज / रशीद शेख चांदापुरी
चांदापुरी ता माळशिरस ग्रामपंचायतीमध्ये तब्बल पंधरा वर्षानंतर सत्ताधारी गटाला पराभवाची धुळ चाखावी लागली.माजी सरपंच भजनदास चोरमले यांच्या विरोधात चांदापुरीतील युवाशक्तीने जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक हाती घेवुन मोहिते पाटील गटाचे सरपंच पदाचे उमेदवार जयवंत सुळ यांना 326 विक्रमी मताधिक्याने निवडुण आले याचबरोबर याच गटाचे 7 सदस्यही विजयी झाले आहेत.
पंधरा वर्षानंतर गावामध्ये परिवर्तन झाल्यामुळे ग्रामस्थांनी पेढे वाटुन पोकलेन मशिनने गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला सत्ताधाऱ्यांचा मनमानीपणा .. एकाधिकारशाही .. गावाच्या विकासाविषयीची अनास्था यामुळे जनतेने हे विजयी परिवर्तन घडवुन आणले असल्याचे नवनियुक्त सरपंच व सदस्यांनी सांगितले .नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून विकासकामाची गती वाढेल अशी अपेक्षा ग्रामस्थाकडुन व्यक्त होत आहे .

या विजयात जेष्ठ नेते केशवराव पाटील ,पार्टी प्रमुख विजय पाटील, शिवाजी चोरमले ,माधव कोळपे ,मुनीर शेख ,बाळासो कोपनर ,शफीक पठाण ,शाहिद शेख,आपा पाटील ,शिवाजी पाटील ,प्रकाश शिंदे ,केशव कोपनर ,हनुमंत कोपनर ,बापु लोखंडे ,अजिज पठाण आदींनी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली.




