लंम्पीने मृत पावलेली जनावरांचे अनुदान तत्काळ द्या /युवा सेनेची मागणी

भूमीपुत्र न्यूज
लंम्पी आजाराने मृत पावलेली जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ मिळावे अशा आशयाचे निवेदन युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, सचिन बागल, गणेश इंगळे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले .
सोलापूर जिल्ह्यात लम्पी आजाराने 2000 जनावरे मृत पावल्याने बळीराजाचे नुकसान झाले आहे.कोरोनाच्या महामारीतून बळीराजा सावरत असतानाच त्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला .त्यातून बळीराजा सावरतो ना सावरतो तोच लगेच जनावरांना लम्पी आजाराने मेटाकुटीस आणले या आजारात सोलापूर जिल्ह्यातील 2900 जनावरे मृत पावली आहेत त्यातील फक्त 910 जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि 1990 जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना भेटले नाही त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे . बाधित शेतकऱ्यांना अनुदान न भेटल्यामुळे शेतकरी जनावरे खरेदी करू शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे. अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी महादेव बिराजदार ,दिग्विजय मोरे आदी युवासैनिक उपस्थित होते .




